गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचा विजय   

हैदराबाद : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अडखळत प्रवास करणार्‍या मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा  रुबाबात खेळताना दिसत आहे. मुंबईविरुद्ध हैदराबाद यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने तब्बल ७ फलंदाज राखून शानदार विजय मिळविला. मुंबईचा गोलंदाज बोल्ट याला सामनावीराचा किताब देवून गौरविण्यात आले. 
 
हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १४३ धावा केल्या. यावेळी ८ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. त्यामुळे मुंबईच्या संघाला १४४ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने ३ फलंदाज गमावत १५.४ षटकांत १४६ धावा केल्या. आणि हा सामना जिंकला. 
मुंबईच्या फलंदाजांपैकी रोहित शर्मा याने ७० धावा केल्या. त्याने सलग दुसर्‍यांदा अर्धशतकी कामगिरी केली. त्याला साथ देताना विल जॅक याने २२ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने नाबाद ४० धावा केल्या. तिलक वर्मा याने नाबाद २ धावा केल्या. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांसमोर हैदराबादची फलंदाजी कोलमडली. हैदराबादचा सलामीवीर हेड हा शून्यावर बाद झाला. तर अभिषेक शर्मा हा ८ धावांवर तंबूत परतला.
 
इशान किशन हा १ धाव करून तंबूत माघारी परतला. नितीश रेड्डी हा २ धावांवर बाद झाला. दीपक चहर याने त्याला सॅटनरकडे झेलबाद केले. क्लासेन याने ७१ धावा करत अर्धशतक केले. 
 
बुमरा याने शानदार गोलंदाजी करत तिलक वर्माकडे त्याला झेलबाद केले. अनिकेत वर्मा १२ धावांवर बाद झाला. तर अभिनव मनोहर हा ४३ धावांवर बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पॅट कमिन्स हा १ धावांवर असताना त्याचा त्रिफळा उडविला.हर्षल पटेल हा १ धावेवर नाबाद राहिला. ४ अवांतर धावा संघाला मिळाल्या. या विजयासह मुंबई इंडीयन्सचा संघ तिसर्‍या स्थानावर आला आहे. तर हैदराबादचा संघ ९ व्या क्रमांकावर आहे. या विजयामुळे मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा वाढल्या आहेत. 

संक्षिप्त धावफलक 

मुंबई इंडीयन्स : रोहित शर्मा ७०, रायन रिकल्टन ११, विल जॅक्स २२, सूर्यकुमार यादव नाबाद ४०, तिलक वर्मा नाबाद २, अवांतर १ एकूण १५.४ षटकांत १४६/३
 
सन रायझर्स हैदराबाद : हेड ०, अभिषेक शर्मा ८, इशान किशन १, नितीश रेड्डी २, क्लासेन ७१, अनिकेत वर्मा १२, अभिनव मनोहर ४३, कमिन्स १, हर्षल पटेल नाबाद १, अवांतर ४ धावा एकूण : २० षटकांत १४३/८
 

 

Related Articles